Type Here to Get Search Results !

Banner

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्येही YCM परीक्षा ऑनलाईनच!

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे 2021-22 या शैक्षणिक वर्षाची परीक्षा ही ऑफलाईन घेण्याचे ठरले होते. परंतु महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भाव यातच राज्यात आढळणारे ओमिक्राॅन रुग्णाची दखल घेत UGC ने दिलेल्या आदेशानुसार आता शैक्षणिक वर्ष 2021-22 ची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. 

यामध्ये खालील परिपत्रकात दिलेले जवळजवळ 56 अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा समावेश आहे. या परिक्षेत विद्यार्थ्यांना 50 प्रश्न असतील त्यापैकी 40 प्रश्न सोडविणे अनिवार्य असणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण दिले जातील.
मिळालेल्या गुणांचे वर्गीकरण अंतिम परीक्षेचा शीर्षाखाली 80 गुणांमध्ये दर्शविण्यात येईल. याआधीही विद्यापीठाने अशाप्रकारे ऑनलाईन परीक्षा घेतल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या