Type Here to Get Search Results !

Banner

सौ.सु.ग.देवकर स्कूल आणि शिशुविकास मंदिरात विद्यार्थ्यांचे स्वागत !


प्रतिनिधी: जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल आणि शिशुविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंददायी शिक्षणाच्या संकल्पनेची गुढी उभारून मोठ्या जल्लोषात बाळगोपाळांचे पायघड्या टाकून पुष्पवृष्टी करून सनईच्या सुरात औक्षण करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी फुगे उडवून विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसाचा आनंद घेतला .शाळा व वर्ग फुलांनी सजवण्यात आली होती ."शिक्षणाची उंच भरारी घेऊया व शिक्षणाचा आनंद घेऊ या" अशी घोषणा विद्यार्थ्यांनी दिली. कार्यक्रमास शालेय समिती सदस्य मा.श्री. दिलीपशेठ मुथा साहेब, विद्यासमिती प्रमुख प्रा. श्री.शरदचंद्र छापेकर सर, समन्वयिका मा.सौ लताताई छापेकर, मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन, शिशुविकास प्रमुख सौ.वृषाली दलाल ,ज्येष्ठ शिक्षक श्री. सुकदेव थोरात  यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व खाऊ वाटप करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश वंजारी तर आभार श्री. नंदकिशोर ढोले यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या