अमळनेर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डातर्फे आज एस.एस.सी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचा इयत्ता १० वी एस.एस.सी परीक्षेचा निकाल ९८.६१ टक्के लागला. कु.गायत्री गणेश वानखेडे ९१.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे अनुक्रमे कु.अनुष्का शरद ब्रम्हे ८८.०० टक्के गुणांसह व्दितीय, तर चि.तेजस कैलास महाजन ८७.४० टक्के तृतीय, कु. मोक्षा विशाल चौधरी ८३.४० टक्के चतुर्थ, चि. प्रदिप अशोक पाटील ८३.०० टक्के पाचवा याप्रमाणे क्रमांक पटकावले. विद्यालयात १३ विद्यार्थ्यांना ८० पेक्षा जास्त, १४ विद्यार्थ्यांना ७० पेक्षा जास्त तर १९ विद्यार्थ्यांना ६० पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, चेअरमन प्रा.डॉ.प्रभाकर जोशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या