जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील सूर्योदय सर्वसमावेशक साहित्य मंडळातर्फे साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट लेखकांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. यावर्षीचा सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार अमळनेर येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. प्रभाकर जोशी यांना संस्थेचे अध्यक्ष सतीश जैन यांनी जाहीर केला आहे. संस्थेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखिल भारतीय सूर्योदय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार जळगाव येथे देण्यात येईल.
प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व वाङग्मयीन कार्य मोलाचे आहे. मराठी वाङग्मय मंडळाच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने 17 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. स्वामीनारायण संप्रदायातील वचनामृत श्रीमद् भागवत कथा पुराण या आध्यात्मिक ग्रंथाचे लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे.
साहित्य क्षेत्रातही भाषा, विज्ञान, साहित्य विचार समीक्षात्मक लेखन, संत साहित्य लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. त्यांच्या मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार या ग्रंथास पुणे येथे राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारही प्राप्त झाला आहे. नव्या पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी बालसंस्कार ही त्यांची पुस्तिका लोकप्रिय होत आहे .
या पुरस्काराचा आनंद त्यांचे मित्र परिवार साहित्य क्षेत्रातील लेखक यांनी व्यक्त केला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नवेपर्व न्यूज महाराष्ट्र परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा...
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या