Type Here to Get Search Results !

Banner

संत सखारम महाराज यात्रोत्सवावर अवकाळी पावसामुळे विरजन!


बोरी पात्रात पाणीच पाणी, दुकानदारांचे पाळणाधारकांचे मोठे नुकसान

अमळनेर: संपूर्ण राज्यात प्रसिद्ध संत संखाराम महाराजाच्या यात्रोत्सवस अक्षय तृतीयेपासून सुरूवात होते. हा यात्रोत्सव सुमारे महिनाभर चालतो. मात्र, यंदा मे महिन्याच्या पंधरवड्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यात्रोत्सवावर विरजन पडले आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने नदीपात्रात पाणीच पाणी शिरल्याने पाळणेधारक व विविध वस्तू विक्रेत्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल १६ मे शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्याने यात्रोत्सवातील व्यावसायिकांची दाणादाण उडाली. बोरी नदीपात्रात तात्पुरते मंडप आदी टाकून ही दुकाने थाटलेली असतात. तसेच विविध भागातील पाळणेधारकही मोठ्या संख्येने आपले पाळणे थाटतात. त्यातच त्यांचा संसारही उघड्यावर असतो. मात्र, दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे या व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. व्यावसायिक आपापल्या वस्तू सांभाळण्यासाठी धाबाधाव करत असल्याचे दिसून आले. पात्रात पारणी साचल्याने यात्रोत्सवात जाणाऱ्या भाविकांचाही हिरमोड झाला आहे.
          यंदा में महिन्यातच गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. कधी सकाळी, तर कधी दुपारी, तर कधी सायंकाळी गेल्या चार दिवसांपासून पाऊस हजेरी लागत आहे. काल आलेल्या पावसाने नागरिकांचीही तारांबळ उडाली. व्यावसायिकांना मदतीसाठी संत सखाराम महाराज वाडी संस्थानचे सेवेकरी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी नदीपात्रात धाव घेऊन व्यावसायिकांची मदत केली. तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही या पाण्याचा निचरा होण्यासाठी परिश्रम घेतले. यामुळे व्यावसायिकांना थोडी का असेना मदत झाली. अमळनेर परिसरातही मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचले होते. यंदा मान्सूनही वेळेत दाखल होण्याची चिन्हे असल्याने शेतकरी आतापासूनच लगबग करू लागला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या