Type Here to Get Search Results !

Banner

चर्मकार विकास संघ तर्फे विजय पवार यांचा सत्कार

चर्मकार विकास संघ तर्फे विजय पवार यांचा सत्कार

जळगाव: चर्मकार विकास संघ जळगांव जिल्हा कार्यकारणी तर्फे जिल्हा सह सचिव म्हणून जिल्हा परिषद जळगांवचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच स्मार्ट एज्युकेशन ऑफिसर पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष श्री चेतन तायडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग स सोसायटी आगामी निवडणुकीसाठी प्रगती शिक्षक सेना गटाकडून अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात उमेदवारी मिळाल्याबद्दल चर्मकार विकास संघाकडून गटाला पाठींबा जाहीर करण्यात आला. या प्रसंगी प्रदेश सदस्य श्री विश्वनाथ सावकारे, अध्यक्ष श्री चेतन तायडे, प्रा.श्री संदीप शेकोकार, श्री.विनोद निंभोरे सर, श्री.नितीन दांडेकर सर, श्री.दीपक रोझोदकर सर, प्रा. डॉ. सुनील निंभोरे सर , श्री विजय काकडे, श्री कुणाल तायडे, श्री. गजानन दांडगे सर, सचिव प्रा.श्री धनराज भारुडे सर उपस्थित होते.श्री विजय काकडे, श्री विजय पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री भारुडे सर यांनी केले. आभार श्री नितीन दांडेकर सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या