Type Here to Get Search Results !

Banner

प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या तीन बेकरी चालकांवर न.पा.ची कारवाई ... तिघा व्याऱ्यांकडून २५ हजारांचा दंड वसूल करून दिली तंबी


अमळनेर (प्रतिनिधी):- नगरपालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक (plastic ban) विरोधी मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून पिशव्यांमध्ये वस्तू विक्री करणाऱ्या आणि साठा करणाऱ्या तीन बेकरी चालकांवर कारवाई केली. या तिघांकडून २५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरात प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यांनी लगेच आरोग्य विभाग व अतिक्रमण विभागाच्या पथकाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, अतिक्रमण विभाग प्रमुख राध्यश्याम अग्रवाल, गौतम बिहाडे, श्याम करंदीकर, गणेश ब्रम्हे, अनंत संदानशिव, आनंद बिहाडे, महेंद्र बिहाडे, योगेश पवार यांनी कारवाई केली. यांच्यावर करण्यात आली.

धुळे रोडवरील चर्च मागे महाराष्ट्र बेकरीवर छापा टाकला. त्यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात साठा देखील केलेला आढळून आला. मालक महंमद सलीम चौधरी याना १० हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच दुपारी पारोळा रस्त्यावरील हिंदुस्थान बेकरी आणि पुष्पक बेकरी यांच्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र बेकरीचे मालक मनिराम यादव व पुष्पक बेकरीचे प्रवीण भोई याना अनुक्रमे १० हजार व ५ हजार रुपये दंड करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या