Type Here to Get Search Results !

Banner

स्व.श्री.एम.एस.मुंदडा विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न


अमळनेर: "यारा तेरी यारी को, मैने तो खुदा माना'' असे म्हणत स्व.श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालयातील सन २०१३-१४ च्या बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली व त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला सर्वच वर्गमित्र एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता. त्यानंतर पुढील कार्यक्रम हा खळेश्वर महादेव मंदिरातील हॉलमध्ये पार पडला.
मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष मा.श्री .प्रकाशभाऊ  मुंदडा व मुंदडा फाउंडेशनचे संचालक मा.श्री .योगेशभाऊ मुंदडा यांच्या शुभहस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
अश्विनी सुतार हिने प्रास्ताविक पर मनोगतातून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले व या संमेलनातूनच मैत्री वृद्धिंगत होत असल्याचे सांगितले.
गीतांजली पाटील, तेजल बोरसे, किरण चौधरी, विनोद महाजन या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या शालेय आठवणींना वाट मोकळी करून दिली तसेच शालेय जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले.
मा.मुख्याध्यापक श्री.धनराज महाजन सर, मा.सौ नेहा पाटील मॅडम, श्री सुनिल पाटील सर, श्री .किशोर पाटील सर, श्री.राजेंद्र महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ मुंदडा यांनी सध्याच्या गतिमान जीवनात शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पहिल्यांदाच कार्यक्रम होत असल्याचे सांगून सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती जे प्रेम दाखवले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. सोशल मीडिया, जीवनातील व्यायामाचे महत्व, मैत्री ही कशा प्रकारची असली पाहिजे . यांच्या विषयी अनमोल मार्गदर्शन केले. व कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले व माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेला डायस भेटवस्तू म्हणून दिले.
कार्यक्रमास शिक्षकेत्तर कर्मचारी सुनिल बोरसे, धर्मेंद्र साळुंखे, रविंद्र चौधरी व भरत पाटील उपस्थित होते. जयेश जगताप व प्रिया  सोनार यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहमेळावा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुर्यकांत महाजन, दिपक पाटील, शुभम पाटील, अलीम पठाण, कृष्णा सुतार, सागर चौधरी, अनिल महाजन, जगदीश महाजन, प्रियंका चौधरी, रूपाली महाजन, आरती सोनार, सोनाली पंजवानी,  सुष्मा महाजन  यांचे सहकार्य लाभले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या