Type Here to Get Search Results !

Banner

जि.प प्राथ. शाळा जवखेडे येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा


अमळनेर: आज १९ फेब्रुवारी जि प प्राथ शाळा जवखेडे येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिनी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. फुलांनी सजवलेला पाळणा, बाल शिवबा, जिजाऊ माँसाहेब, हातात भगवा ध्वज धरलेले बाल मावळे, सर्व नऊवार साडी नेसून सजलेल्या बालिका जणूकाही अवघी शिवशाहीच आमच्या जिल्हा परिषद जवखेडे शाळेत अवतरली होती. यावेळी बालशिवरायांचा पाळणा घेण्यात आला. यावेळी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. शिवजन्मोत्सवाचा जिवंत देखावा सादर करतांना मॉ जिजाऊ झालेली आमुची यश्वी हिने अगदी मातृत्व भाव चेहऱ्यावर आणत बाल शिवबाला पाळण्यात जोजावले खूप सुंदर असे दृष्य जे आपण खरोखरच शिवनेरीवर अनुभवतो आहे असे जाणवले. गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत आकर्षण ठरले आमचे बाल शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व बाल मावळे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी जवखेडे गावाचा परिसर दुमदुमून गेला . त्यानंतर शाळेत आल्यावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता चौथीतील कार्तिक या विदयार्थ्यांने शिवछत्रपतीच्या जयघोषाची गारद अतिशय सुंदर सादर केली.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी भाषणे सादर केलीत. यानंतर मुख्याध्यापक छगन पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुकेश पाटील सर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक छगन पाटील, उपशिक्षक रत्नप्रभा साळुंखे,रेखा पाटील,सुनिता पाटील,अर्चना बागुल, माधवराव ठाकरे, मुकेश पाटील व युवा प्रशिक्षणार्थी अनिता बोरसे यांनी परिश्रम घेतले. अशारीतीने शिवजन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या