Type Here to Get Search Results !

Banner

मा.खासदार व मा.तहसिलदार यांच्या उपस्थितीत जि.प.प्राथ शाळा जवखेडे ता.अमळनेर येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा


अमळनेर: आज दि. 16 जून 2025 सोमवार रोजी शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमांतर्गत शंभर शाळा भेटी यामध्ये  लोकप्रतिनिधी मा खासदार जळगाव लोकसभा क्षेत्र मा ताईसो श्रीम स्मिता उदय वाघ व अधिकारी अमळनेर तहसिलदारसो श्री रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागताचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रतिमापूजन करण्यात येऊन बुके नाही तर बुक देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी इ १ली तील दाखल विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पाठयपुस्तक, शालेय गणवेश व बुट-मोजे यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या भेटीवेळी मा खासदार सो व तहसिलदारसो यांनी शाळा वर्गखोल्या व परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत उपलब्ध भौतिक सुविधा, विद्यार्थी खेळाच्या सुविधांचा दर्जा, पूरक व्यवस्था, स्वच्छतेच्या सवयी, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, जलशुद्धीकरण यंत्र , शालेय पोषण आहार स्वच्छता व गुणवत्ता याबाबत प्रत्यक्ष पाहणी करत मार्गदर्शन केले व सर्व सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसिलदारसो श्री सुराणा साहेब यांनी शालेय गुणवत्ताबाबत मार्गदर्शन करत पुढील काळात देखील अशीच गुणवत्ता व शाळेचा दर्जा टिकवण्यास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माजी जि प सदस्य दादासो श्री संदिप पाटील यांनी शालेय गुणवत्ता व उपक्रमांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तदनंतर अध्यक्षीय भाषणात मा खासदार ताईसो स्मिता वाघ यांनी आपल्या बालपणीच्या शाळेच्या आठवणी सांगत शालेय शिक्षण किती महत्वाचे आहे याचे महत्व सांगुन मुलांना रोज शाळेत येण्याचे आवाहन केले. शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थी गुणवत्ता याबाबत समाधान व्यक्त करत मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक करत यापुढे देखील हा शाळेचा दर्जा असाच टिकून राहील अशी आशा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

      या कार्यक्रमाला ग्राम पंचायतीचे सरपंच मा ताईसो जयश्री माळी व सर्व ग्राम पंचायत सदस्य, बाला उपक्रम अध्यक्ष दादासो प्रशांत पाटील व सर्व समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ताईसो कविता पाटील व सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक व पालक वर्ग, सर्व अंगवाडी मधील सेविका उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नानासो श्री छगन पाटील, उपशिक्षक श्रीम रत्नप्रभा साळुंखे, श्रीम रेखा पाटील, सौ सुनिता पाटील, श्रीम अर्चना बागुल, श्री मुकेश पाटील, श्री माधवराव ठाकरे, युवा प्रशिक्षणार्थी श्रीम अनिता बोरसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम अर्चना बागुल यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री छगन पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या