भूषण महाले/जळगाव: येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 वाजता जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख अतिथी तथा योगशिक्षिका प्रा.डॉ. डिंपल पाटील मॅडम व सौ. शकुंतला महाजन मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. प्रशांत जगताप सर, श्री. संजय वानखेडे सर यांच्या हस्ते माता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथींचे यथोचित स्वागत करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे फायदे सांगितले. त्यांच्या समवेत शाळेचे सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील विविध योगासने केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर यांनी भूषवले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक केली.
प्रमुख पाहुण्यांनी सर्वांचा उत्साह वाखाणला आणि सुदृढ आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले.या प्रसंगी भारत सरकार आयुष मंत्रालयाच्या शासकीय प्रोटोकॉलनुसार योगसंगम कार्यक्रम शिस्तबद्धतेने पार पडला.
या वेळेस योगसाधकानी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारची योगासने करून घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. योगिता गवलकर मॅडम यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री मयुर पाटील सर यांनी केला. तसेच सूत्रसंचालन सौ. संपदा तुंबडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती योगिता महाजन मॅडम यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या