भूषण महाले/अमळनेर -अमळनेर या योग शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध योग शिक्षक मा. श्री. धर्मसिंह धनसिंह पाटील सर उपस्थित होते. त्यांनी विविध योग प्रकार, प्राणायाम आणि त्याचे दैनंदिन जीवनातील फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. योगासनांच्या माध्यमातून मानसिक व शारीरिक आरोग्य कसे सुधारते, याचे प्रभावी उदाहरण उपस्थितांसमोर सादर केले.
कार्यक्रमात शाळेचे शिक्षक श्री किशोर बडगुजर यांनीही योगासनांची प्रात्यक्षिके घेतली. या प्रसंगी लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोहर महाजन व नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अतुल भोई यांनी योग शिक्षक मा. श्री डी. डी. पाटील सर यांचा सत्कार करून त्यांचे योगदान गौरवले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक मकरंद निळे यांनी केले. संपूर्ण परिसर योगमय वातावरणाने भारलेला होता आणि सहभागी सर्वांनीच हा अनुभव स्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या