Type Here to Get Search Results !

Banner

अमित गायकवाड यांच्या कडून विद्यार्थ्यांना नवनीत शिष्यवृत्ती प्रश्नसंच भेट

अमित गायकवाड यांच्या कडून विद्यार्थ्यांना नवनीत शिष्यवृत्ती प्रश्नसंच भेट

पुणे: आज गुरुवार दिनांक १६ सप्टेंबर 2021 रोजी ग्रामविकास फाऊंडेशन, कोंढापुरी जि.पुणे सदस्य अमित चंद्रकांत गायकवाड यांची कन्या कु.श्रावणी हिचा वाढदिवसानिमित्त अमित गायकवाड यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना 20 नवनीत शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका संच भेट दिले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धनंजयशेठ गायकवाड, मुख्याध्यापक सुदाम लंघे सर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दौंडकर सर, ग्रामपंचायत सदस्य राहुलशेठ दिघे, उद्योजक संदिप लवांडे, नितीन गायकवाड, सोमनाथ गायकवाड, नानासो.गायकवाड, वैभव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या वतीने कु.श्रावणी हिस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या