Type Here to Get Search Results !

Banner

वावडदा येथील ग्रामपंचायत सरपंचपदी ॲड.श्री.राजेश वाडेकर सर यांच्या पुन: नियुक्ती बद्दल चर्मकार विकास संघातर्फे हृदय सत्कार संपन्न


जळगाव: तालुक्यातील  वावडदा येथील सरपंच ॲड. श्री.राजेश वाडेकर सर यांच्यावरील अनियमित प्रशासकीय  कार्य केल्याचे विरोधकांचे खोटे आरोप मान.उच्च न्यायालयाने खारीज करून  श्री.राजेश वाडेकर सर निर्दोष असल्याचा निकाल दिल्याने जिल्हा प्रशासनातर्फे ॲड.श्री.राजेश वाडेकर सर यांची वावडदे ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी पुन्हा नियुक्ती झाल्याबद्दल बुधवार दिनांक 9 जुलै रोजी चर्मकार विकास संघातर्फे त्यांचा हृदय सत्कार चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष ॲड.श्री.अर्जुन भारुळे यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ  देऊन करण्यात आला.या प्रसंगी भुसावळचे समाजसेवक श्री.प्रमोदभाऊ सावकारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.तसेच श्री.संजय भटकर सर,श्री.संजय वानखेडे सर,प्रा.धनराज भारुळे सर यांनी श्री.राजेश वाडेकर यांनी गावच्या विकासासाठी केलेल्या विविध समाजपयोगी कार्याची तसेच त्यांनी राबविलेल्या विविध शासकीय उपक्रमांची माहिती देऊन त्यांच्या विधायक कार्याचे अभिनंदन केले .तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी चर्मकार विकास संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री विश्वनाथभाऊ सावकारे, श्री.संजय वानखेडे सर, श्री.संजय भटकर सर, श्री.मनोजभाऊ सोनवणे, ॲड.श्री.अर्जुन भारुळे, प्रा.श्री.धनराज भारुळे, श्री.काशीनाथ इंगळे, श्री.बाळकृष्ण खिरोळे, प्रा.संदीप शेकोकार,श्री. कमलाकर ठोसर, श्री.प्रकाश रोजतकर,श्री. रतीराम सावकारे, श्री.अविनाश वानखेडे सर, श्री.संदीप ठोसर सर,प्रा. विठ्ठलराव सावकारे, श्री.शिवदास कळसकर, श्री.सीताराम राखुंडे, श्री.अनिल अहिरे सर,श्री.संजय राजपूत, श्री. भिकाभाऊ राजपूत, श्री.प्रदीप तेली, श्री.विजय राखुंडे, श्री.लिलाधर भारुळे, श्री.ज्ञानदेव भारुडे, श्री.युवराज वानखेडे,श्री.पंकज भारुळे, आदि उपस्थित होते.या प्रसंगी सत्कारमूर्ती ॲड.श्री.राजेश वाडेकर सर यांनी समाजबांधवांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  श्री.यशवंत वानखेडे, दीपक कळसकर, पंकज भारुळे, श्री.कमलेश वाढे यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या