Type Here to Get Search Results !

Banner

कै.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्य विद्यालय भरवस येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

कै.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्य विद्यालय भरवस येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

भरवस, ता.अमळनेर: कै.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस या शाळेत भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त 'वाचन प्रेरणा दिवस' साजरा करण्यात आला. अगोदर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या कार्याचे माहिती विद्यार्थ्याना सांगण्यात आली. त्यानंतर वाचनाचे जीवनातील महत्व बाबत विद्यार्थ्याना सांगण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्याना वाचण्यासाठी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके देण्यात आली त्यात त्यांना आवडलेल्या भागाचे त्यांच्याकडून वाचन करण्यात आले. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री व्ही.एस. सोनवणे होते तर प्रास्तविक श्रीमती एम. टी.चव्हाण यांनी केले. श्रीमती ए.एस.पाटील, श्री डी. बी.पाटील यांनी परीक्षण केले त्यांना श्री.एस. टी.सोनवणे, पी. व्हि.पाटील, एस.डी.पाटील यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन श्री.आर.आर. सोनवणे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या