Type Here to Get Search Results !

Banner

अमळनेरचा निखिल सोनवणे ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

अमळनेरचा निखिल सोनवणे ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

पुणे येथील सीओईपी महाविद्यालयात कोरलं अमळनेरचं नाव

अमळनेर: शहरातील शिव पार्वती कॉलनी भागातील रहिवासी निखिल संजय सोनवणे हा पुणे येथील सीओईपी महाविद्यालयात एम.टेकच्या विद्यार्थ्यांमधून सुवर्णपदकाचा सर्वोच्च मानकरी ठरला आहे. निखिलने मेकॅनिकल डिझाईन विषयात एम.टेक. पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. मूळचे पाष्टे ता.शिंदखेडा येथील रहिवासी तथा भरवस हायस्कूलचे शिक्षक संजय ताराचंद सोनवणे यांचा तो मुलगा आहे. अमळनेर येथील सानेगुरुजी हायस्कूल व प्रताप महाविद्यालयाचा तो विद्यार्थी असून इयत्ता बारावीत देखील विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला होता. शालेय शिक्षण घेत असताना तो नेहमीच अभ्यासात हुशार व शांत विद्यार्थी म्हणून परिचित आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवसचे अध्यक्ष संजय सोनवणे व मुख्याध्यापक व्ही.एस.सोनवणे यांनी त्याचे आभिनंदन केले आहे. सर्व मित्रमंडळी व नातेवाईकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नवेपर्व न्यूज परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या