Type Here to Get Search Results !

Banner

यु पी एस सी च्या परीक्षेत अमळनेरचा तुषार पाटीलचे देदीप्यमान यश

 

देशात 72 व्या क्रमांकाने उत्तीर्ण. भारत सरकारने यूपीएससी मार्फत घेतलेल्या सीडीएस (combined Defence services Examination 2021) परीक्षेचा निकाल दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेला असून या परीक्षेत रंजाणे तालुका अमळनेर येथील तुषार मच्छिंद्र पाटील याने दैदीप्यमान यश संपादन केले असून इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये देशात 72वा तर भारतीय नौदलात 42 वा क्रमांक पटकाविला आहे त्यामुळे तुषार याला भारतीय सैन्यदलात थेट लेफ्टनंट पदी विराजमान होऊन देश सेवेकरिता उच्च पदावर कर्तव्य बजावण्याची संधी प्राप्त झाली आहे. तुषार ने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या एकविसाव्या वर्षी सदरचे यश प्राप्त केले असून त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे व अमळनेरचे नाव देशात उंचावलेले आहे. तुषार चे वडील मच्छिंद्र दोधू पाटील हे देखील सी आर पी एफ दलात सब इन्स्पेक्टर म्हणून जम्मू कश्मीर येथे देशसेवा बजावीत आहेत. तुषार हा माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड व्ही आर पाटील यांचा नातू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या