अमळनेर: मा.श्री मनोहर भगवान महाजन सर (मुख्याध्यापक. लोकमान्य विद्यालय, अमळनेर )(अध्यक्ष - क्षत्रिय काचमाळी समाज अमळनेर) व ताईसाहेब सौ रंजना मनोहर महाजन ( सामाजिक कार्यकर्त्या, अमळनेर ) यांचे चिरंजीव,मा डॉ श्री हिमांशु मनोहर महाजन (आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी,पारोळा ) यांच्या वाढदिवसानिमित्त चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा येथे विशेष मुलांना मिष्टांन्न भोजनासाठी 5100/- रुपये देणगी दिली. अमळनेर येथील मार्गदर्शक श्री मनोहर महाजन सर यांचे सामाजिक कार्य नेहमी अग्रेसर असून, जिद्द व मेहनतीच्या जोरावर ताईसो रंजना महाजन व श्री मनोहर महाजन सर यांनी डॉ. श्री हिमांशू मनोहर महाजन यांचे आरोग्य क्षेत्रात MBBS शिक्षण पूर्ण केले. आपले चिरंजीव डॉ हिमांशु महाजन यांचा वाढदिवस विशेष मुलांसमवेत साजरा करून समाजामध्ये प्रेरणा व एक आदर्श निर्माण केलेला आहे. श्री मनोहर महाजन सरांचे सामाजिक कार्य वाखाण्याजोगे राहिलेले आहे. डॉ. हिमांशू महाजन यांनी सांगितले की जेव्हा जेव्हा मुलांना आरोग्य सेवा हवी असेल तेव्हा आरोग्य सेवेसाठी मी नेहमी तत्पर राहील. श्री मनोहर महाजन सर व परिवाराचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष डॉ योगेश रघुनाथ महाजन सर यांच्यावतीने शाळेचे मुख्याध्यापक, मनीष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन सर यांनी श्री मनोहर महाजन सर व परिवाराचे खूप खूप आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
डाॅ.हिमांशू महाजन यांचा अनोखा वाढदिवस साजरा!
२३ जुलै
0
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या