प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपालांसाठी शालार्थ प्रणाली मध्ये नवीन टॅब द्यावा - महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना
२७ सप्टेंबर
0
मुंबई | प्रतिनिधी : प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपालांना सहाव्या वेतन आयोगात कालबद्ध पदोन्नती योजनेची वेतनश्रेणी निश्चित करण्यात आलेली नसल्याने सुधारित कालबद्ध वेतन श्रेणी करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य सचिव भानुदास शिंदे यांनी सांगितले. सातव्या वेतन आयोगानुसार लागू करावयाच्या वेतन श्रेणी बाबत शालार्थ प्रणाली मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक का साठी ग्रेड पे चा २२०० व पदवीधर ग्रंथपालांना साठी ग्रेड पे चा ३१०० चा टॅब उपलब्ध नसल्यामुळे त्यांची कालबद्ध वेतन श्रेणी निश्चिती करता येत नाही म्हणून हे कर्मचारी वेतन श्रेणीपासून वंचित आहेत. सदर वेतनश्रेणी सुरू होण्यासाठी आयुक्त (शिक्षण) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी पत्राव्दारे शालार्थ प्रणालीमध्ये ग्रेड पे चा नवीन टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या