Type Here to Get Search Results !

Banner

सिमरन मोमीन ची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड

 

        शास्त्री नगर परिसरातील श्री समर्थ विद्या मंदिर शाळेतील  विद्यार्थिनी *सिमरन आरिफ मोमीन*  हिची यावर्षीच्या इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड करण्यात आली आहे.

       भारत सरकारकडून आयोजित केल्या जाणाऱ्या इन्स्पायर अवॉर्डसाठी सिमरन मोमीन हिला रु. 10,000/- इतके पारितोषिक जाहीर झाले आहे.

        बालिका दिनानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात सिमरन मोमीन हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर महानगरपालिका मुख्य आरोग्य निरीक्षक जयकुमार वरवडकर, सौ. वंदना कांबळे, आय. जी. बिराजदार, मुख्याध्यापिका शालिनी शिखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्गशिक्षक राजकिरण चव्हाण यांनी सिमरन मोमीन हिला याकामी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव अरुण शिखरे, शाळेतील शिक्षक व पालक यांनी कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या