Type Here to Get Search Results !

Banner

लता दीदींच्या निधनाचा दुखवटा; राज्यात उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर, महाविद्यालय, शाळाही, बंद राहणार: Lata Mangeshkar

 

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर Lata Mangeshkar यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयं देखील बंद राहणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (सन १९८१ चाअधिनियम २६) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या