Type Here to Get Search Results !

Banner

बदली पोर्टलचे काम सुरु ! गुरुजींच्या बदल्यांसाठी जुलै उजाडणार ?


गुरुजींच्या आंतरजिल्हा बदल्या ( Teachers Transfer ) यावर्षी प्रथमच ऑनलाइन पध्दतीने होणार आहेत. त्याकरीता नवी संकेतस्थळ ( transfer portal ) तयार करण्याचे काम सुरु आहे. मागील दीड-दोन महिन्यांत या संकेतस्थळाचे काम अर्ध्यावर म्हणजे जवळपास ७० टक्क्यांपर्यंतच झाले असल्याने गुरुजींच्या बदली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जुलै उजाडेल, अशी माहिती ग्रामविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

राज्यातील शाळा १३ जून रोजी सुरु होणार आहेत. त्यापूर्वी, बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतू, संकेतस्थळाचेे काम अजून अपूर्ण असल्याने ३० जूनपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होतील, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. पण, प्रत्यक्षात बदल्यांची ( transfer ) प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास जुलै उजाडेल, अशी सद्यःस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आज 18 मे बुधवार रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ ( hasan mushrif ) व शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड ( varsha gayakwad ) यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

शिक्षक बदली प्रक्रियेचे टप्पे... 
- संकेतस्थळाचे काम अपूर्ण असल्याने ३१ मे ऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ 

- संकेतस्थळाचेे काम पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना ८-१० दिवसांत भरावी लागणार स्वतःची माहिती 

- दरवर्षी अंदाजित अडीच लाख शिक्षक करतात आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज 

- जात प्रवर्गानुसार रिक्त जागांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे घ्यावे लागते ना हरकत प्रमाणपत्र 

- एकाच जिल्ह्यात तीन ते पाच वर्षांपर्यंत काम केलेले शिक्षकच बदल्यांसाठी पात्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या