Type Here to Get Search Results !

Banner

ताडेपुरात ई-श्रम कार्ड वाटप चंद्रकांत कंखरे यांचा स्तुत्य उपक्रम


अमळनेर : लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे यांनी ताडेपुरावासीयांना निशुल्क ई-श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप केले. मा. आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ यांनी आहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. त्यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन व कार्ड वितरण पार पडले. श्रमिक कामगारांना निशुल्क व जागेवर उपलब्ध झाल्याने उपक्रमाचे कौतुक करत कंखरे यांचे आभार मानले. यशस्वीतेसाठी आहिल्याबाई मित्र मंडळ, ताडेपूरा येथील सदस्यांनी परिश्रम घेतले. कंखरे यांच्या वतीने या परिसरात विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असतात.


वाॅट्सअॅप गृप जाॅईन करण्यासाठी 👉 https://chat.whatsapp.com/CBfQSsQ2X6V2Ly7nBm9BOT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या