अमळनेर: ( प्रतिनिधी) येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 96.28 टक्के लागला असून विज्ञान शाखेत गुणानुक्रमे प्रथम-पाटील देवयानी महेंद्र 86.67%, द्वितीय-यादव सुचिता अभयराज 85.67%, तृतीय-जैन पलक पंकज 85.67%, चतुर्थ-कदम मानसी दिलीप 85.50%, पाचवी-पांडव निकिता गोपाल 85.00% या असे गुण पटकाविले आहेत.
तर आर्ट्स शाखेत गुणानुक्रमे प्रथम-माळी सुवर्णा पांडुरंग 76.17%, द्वितीय-ठाकरे प्रियंका दीपक 74.50%, तृतीय-भदाणे निशा योगेश 74.00%, चतुर्थ-पाटील रोहिणी दगडू 73.83%, पाचवी-कोळी अश्विनी बापू 73.33% असे नंबर व गुण पटकाविले आहेत.
या परीक्षेसाठी एकूण विद्यार्थी 768 त्यापैकी 165 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये त्याचप्रमाणे 475 मुलं फर्स्ट क्लास व 102 मुलं सेकंड क्लास असे एकूण 744 विद्यार्थी पास झाले आहेत.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी.पाटील, उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील, खजिनदार दादासो शैलेंद्र पाटील व सर्व संचालक मंडळाने तसेच विज्ञान विभाग प्रमुख डॉ.पी.डी.पाटील व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या