Type Here to Get Search Results !

Banner

कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष ममता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री महाले सर सेवानिवृत्त


अमळनेर तालुक्यातील ममता विद्यालय तथा कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश पितांबर महाले हे दि.30 जून 2022 रोजी आपल्या नियतवयोमानानुसार वयाची 58 वर्षे पुर्ण झाल्याने तब्बल 27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले म्हणून ममता विद्यालय अमळनेर येथे निरोप समारंभ पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.प्रभाकर भावे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे अध्यक्ष डाॅ.मंगेश वैद्य, सचिव वैशाली वैद्य तसेच प्राध्यापक श्रीकांत जोशी, माजी मुख्याध्यापिका विद्याताई जोशी हे होते.

सदर प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने प्रा.भावे यांनी सत्कारमूर्ती महाले सर यांच्या कार्याचा गौरव करुन शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर डाॅ.मंगेश वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सत्कारमूर्तींना यापुढेही शालेय कामकाजात मार्गदर्शन लाभेल ही अपेक्षा व्यक्त केली, आणि शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव केला. त्यानंतर ममता विद्यालयाचे शिक्षक विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी भेटवस्तू देऊन गौरव केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी लिपीक व संस्थेचे संचालक श्री गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार शिक्षक विनोद पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या