Type Here to Get Search Results !

Banner

सीड बॉल कॅम्पेन चाळीसगांव नियोजनाची प्रथम बैठक आयोजक व सदस्यांच्या उपस्थितीत पार


निसर्ग संवर्धन व ग्रीन सिटीसाठी राबविण्यात येत असलेले सीड बॉल कॅम्पेन चाळीसगांव ही मोहीम दि.१५ मे पासून शहारत राबविण्यात येत आहे. यात आपण वर्षभर खाल्लेल्या फळांच्या बिया किंवा आपल्या परिसरात असलेल्या विविध फूल/फळ/इतर झाडांच्या बिया आपल्याला वर्षभर जमवून पावसाळा सुरू होण्याअगोदर  पोषक माती व शेणखत एकत्र करून लहान गोळे तयार करून त्यात या झाडांच्या बिया टाकून हे " सीड बॉल " तयार केले जाणार आहेत व पावसाळ्याच्या सुरवातीला शहरात व लगतच्या परीसरात आवश्यक असलेल्या ठिकाणी टाकून वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
निसर्ग संवर्धन व ग्रीन सिटीसाठी निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, मजूर, कर्मचारी, अधिकारी पर्यावरणासाठी व शहरासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. राष्ट्रीय व सामजिक कार्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन कॅम्पेन आयोजक शिक्षक हेमंत भास्कर मोरे यांनी केले आहे.

कॅम्पेनच्या रुपरेषेनुसार पहिला टप्पा सीड संकलनाचा दि.१५मे पासून सुरू असून दि.३०मे रोजी पूर्ण झाला. कॅम्पेनचा दुसरा टप्पा सीड वर्गीकरण व पुढील नियोजन माती परीक्षण, सीड बॉल्स तयार करण्याबाबत कार्यशाळा, तयार सीड बॉल्स रोपण करणे अश्या व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरवातीला कॅम्पेन आयोजक शिक्षक हेमंत भास्कर मोरे यांनी सीड बॉल कॅम्पेनची सविस्तर माहिती दिली, तसेच तयार सीड बॉल उपस्थित सदस्यांना दाखवून, सीड बॉल्स तयार करण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. चाळीसगांव मधील हा पहिला प्रयत्न असून कमीत कमी एक हजार किंवा अधिक सीड बॉल तयार करण्यात येणार आहे. बैठकीत उपस्थित सदस्यांपैकी प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली, तसेच योग्य विचार कॅम्पेनच्या यशस्वीतेसाठी घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

या नियोजन बैठकीला श्री.मनोज करंकाळ, श्री.योगेश बोरसे, श्री.संजय राठोड, श्री.दिपक शेलवडकर, श्री.जगण राठोड, श्री.दिलीप पवार, श्री.शशांक आहिरे, श्री.कुणाल रुईकर व विद्यार्थी मनोज राठोड व पियूष राठोड उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या