लोकमान्य विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांनचा गुण गौरव
अमळनेर येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात नुकताच प्रकाशित झालेल्या एस एस एसी परीक्षेत विद्यार्थ्यानी जे उज्वल यश संपादन केले त्यांचा गुण गौरव संस्थेच्या कार्यालयात करण्यात आला विद्यालयातून चि ऋषिकेश खंडाळे ९६:६0%गुण प्राप्त करून प्रथम आला तर व्दितीय ९२:४०%चि अंकित सोनवणे आला तर तृतीय ९०:८० गुण मिळवून कु स्नेहल महाजन ही आली शाळेचा एकुण निकाल ९७% लागला असुन या गुणवंतांचा गौरव संस्थेचे कार्याध्यक्ष मा प्रा अरविंद फुलपगारे उपकार्योपाध्य मा श्री राजेंद्र खाडिलकर चिटणीस मा श्री विवेकानंदजी भांडारकर कार्यकारी संचालक मा प्रा र. रा. बहुगुणे. मा प्रा डॉ प्र. ज. जोशी मा श्री राजेंद्र नवसारीकर यांचे हस्ते करण्यात आला तर या प्रसंगी लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मा श्री रवींद्र लष्करे जेष्ठ शिक्षक व प्रतिनिधी मा श्री मनोहर महाजन श्री नचिकेत महाले उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या