Type Here to Get Search Results !

Banner

जिल्हा परिषद शाळा मारवड येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न!


अमळनेर: काल जिल्हा परिषद शाळा मारवड येथे बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सरपंच ताई सौ आशाताई भील व उपसरपंच आबासो. भिकनराव पाटील, मा.केंद्र प्रमुख दादासो श्री अशोकजी सोनवणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पालक, ग्रामस्थ तसेच शिवपुराण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे एकूण 46 स्टॉल लावण्यात आले होते. त्यापैकी पहिला क्रमांक चि.मनन शंकर कोळी दुसरा क्रमांक  कु.मृणाली साळुंखे तिसरा क्रमांक चि.गणेश उमेश सुर्वे चौथा क्रमांक चि.मयुरेश अमोल निकम, पाचवा क्रमांक कु.भैरवी जाधव यांचा आला. 

सहभागी विद्यार्थ्यांना मा.दादासो हर्षलजी पाटील सायन्स कॉलेज मारवड यांनी बक्षीस वाटप केले. दादासो श्री.प्रशांत बोरसे यांनी प्रथम स्टॉलला पाचशे रुपये आणि ताईसो सौ.कविता चौधरी ग्रामपंचायत सदस्य यांनी दोनशे रुपयाचे बक्षीस दिले. कार्यक्रमास ग्रामस्थांचा अभूतपूर्व  प्रतिसाद मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या