Type Here to Get Search Results !

Banner

मारवड येथे रंगणार ४ नोव्हेंबरला माहेरवाशीनिंचा सोहळा वाट माहेरची


अमळनेर: दि 4 नोव्हेंबर 2024 रोजी मारवड ता.अमळनेर येथील सुही मुंदडे हायस्कूल मारवड येथे 20 वर्षांपासून ते चक्क 90 वर्षे वयापर्यंत च्या सर्व विवाहित माहेरवाशीणींचा स्नेहमीलन सोहळा आयोजित केला आहे.त्यात इतर गावांहून मारवड येथे शिक्षणासाठी येणाऱ्या सर्व माहेरवाशीण भगिनींचा समावेश असणार आहे.

सकाळी 8 वाजता संपूर्ण गावात विविध कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषेत सर्व भगिनींची रॅली निघेल, त्यांनतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कार्यक्रम होतील,महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आहेत.ह्यात बालपणी च्या आठवणींना उजाळा देऊन पुन्हा एकदा लहान होण्याचा अनुभव घेता येणार आहे. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी मुक्ताई, ज्ञानदेव ग्रुप,मारवड विशेष मेहनत घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या