चित्रा साळुंखे यांच्याकडून बालकाच्या कल्पनेतील सायकल भेट
दि २७ पारोळा शहरातील एक व आता इयत्ता ८ वीचा विद्यार्थी इद्रिस अली सैय्यद हा शाळा क्र ३ पारोळाचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या संपर्कात होता . एक हुशार , सुस्वभावी , अभ्यासु व धडपडणारा विद्यार्थी म्हणुन ते त्याला सदैव छोटी मोठी शैक्षणिक मदत करत .
गेल्या महिन्यात साळुंखे यांच्या पत्नी चित्रा मनवंतराव साळुंखे यांनी इन्टाग्राम वर त्या बालकाच्या वडीलांच्या मोबाईलवर त्याची सायकलच्या फोटोसह " मेरे सपनोंकी राणी " अशी पोस्ट बघितली . त्यांनी ही गोष्ट आपले पती साळुंखे यांना सांगितली . दोघांनी विचार केला की हा बालक अतिशय गरीब घरातील . सहा जनांचे कुटुंब व पत्र्याचे घर . त्याचे वडील केळी विक्री करून कसाबसा आपला संसाराचा गाडा ओढतात . त्याच्यासह तीन बहिणींचा शिक्षणाचाही खर्च पेलतात . त्यात मागे ते मोठया आजारातुन बरे झाले . या आर्थिक तंगीत त्या बालकाचे वडील त्याचे सायकलचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही ते आपण पुर्ण करू . मुख्याध्यापक साळुंखे यांनाही आपल्या पत्नीच्या या विचाराचा आनंद झाला .
आज २७ जानेवारी त्या बालकाचा १३ वा वाढदिवशी त्याची स्वप्नों की राणी म्हणजे त्याची आवडती सायकल त्याला भेट देण्याचे ठरविले .
तो सुंदर उपक्रम आज पारोळा केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत , गुणवंतराव शिवदास पाटील , निवृत्त मुख्याध्यापक , किशोर एकनाथ सोनवणे , सचिव उत्कर्ष ज्येष्ठ नागरीक संघ , प्रकाश बाबुराव शिंपी , विश्वस्त बालाजी मंदिर संस्थान , दिपकमामा कोळपकर , न पा निवृत्त कर्मचारी यांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते इद्रिस अली सैय्यद याला सायकल भेट देवुन पार पडला . त्याला शाळेत बोलावून अचानक व अनपेक्षितपणे झालेल्या या स्वप्नपूर्तीचा खुप आनंद झाला . शाळेत जाणे , वडीलांना डबा दयायला जाणे , घरातील बाजाराची कामे करणे आता मला सोपे होईल अशी भावना त्याने व्यक्त केली . यावेळी किशोर सोनवणे व दिपक मामा कोळपकर यांनी प्रत्येकी २५१ रु रोख त्याला शैक्षणिक भेट दिली . याप्रसंगी केक कापुन त्याचा वाढदिवसहि साजरा करून शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही केकसह खाऊ वाटप करण्यात आला.
गुणवंतराव पाटील यांनी इद्रिस याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत . चांगला अभ्यास करून प्रगती दाखविली तर मी सुद्धा हवी ती मदत करेल असे अश्वासन दिले . किशोर सोनवणे यांनी त्याला सायकलीचा योग्य वापर करून अभ्यासाकडे दुर्लक्ष न करण्याच्या सुचना केल्या व विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघावी व ती पुर्ण करण्यासाठी अभ्यास करावा अशी प्रेरणाही दिली .
केंद्र प्रमुख प्रदिप राजपुत यांनी सायकल ही पर्यावरणपूरक वाहन असुन लहानांसह मोठयांनी सुद्धा शक्य तेथे सायकलीचा वापर करावा . त्याच्याने प्रदुशण कमी तर होईलच पण आपले आरोग्यही चांगले राहील . तसेच या गरीब बालकाची स्वप्नपूर्ती केल्याबद्दल चित्रा साळुंखे यांचे आभार व अभिनंदन केले .
मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी सुत्रसंचलन तर अर्चना सेवलीकर यांनी आभार प्रदर्शन केले . या उपक्रमाला तरन्नुम सैय्यद , दिपाली पाटील व राहुल साळुंखे भिलाली यांचे सहकार्य लाभले .
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या