Type Here to Get Search Results !

Banner

जि.प.उर्दु शाळेच्या शिक्षण परिषदेत " बेटी बचाव " चा जागर


मुलगीही वंशाचा दिवा मानणाऱ्या शिक्षिका मातांचा गौरव सह ३२ गुणवंत बालिकांना बक्षिसे भेट


पारोळा: केंद्र शिक्षण परिषद ही त्या त्या केंद्र समुहातील शाळांची एक शैक्षणिक विचार, उपक्रम व नाविन्यता यांची देवाण घेवाण करण्यासाठी असते . त्या ठिकाणी प्राप्त ज्ञानाचा उपयोग आपल्या शाळेवर व्हावा हे शिक्षकांकडुन अपेक्षित असते . आज पारोळा केंद्र समुहाच्या शाळांची जि प उच्च प्राथ उर्दु कन्या शाळा पारोळा आयोजित शिक्षण परिषदेला भेट देवुन आनंद वाटला .
या ठिकाणी राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांनी त्यांच्या साने गुरुजी धडपडणारा आदर्श विद्यार्थी अंतर्गत २५ विदयार्थीनींना रायटिंग पॅड दिले , बहादरपूर येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात यश मिळविणाऱ्या ३ विदयार्थीनींना आकर्षक कंपास बॉक्स देवुन प्रोत्साहन दिले . इयत्ता ३ री च्या उत्कृष्ट इंग्रजी शब्द सांगितल्यावर अचूक स्पेलिंग लेखन करणाऱ्या ४ विदयार्थीनींना प्रत्येकी १०१ रु रोख बक्षिस देवुन त्यांच्या गुणांचे कौतुक केले . तसेच केंद्रातील ३ शिक्षक माता श्रीमती स्मिता सोळंके शेवगे बु॥ , श्रीमती मयुरी पाटील कन्या २ पारोळा व सुलताना मोहंमद सिद्दिक, उर्दु बॉ शाळा पारोळा यांनी दोन मुलींवर समाधान मानुन त्यांनाच आपल्या वंशाचा दिवा ठरवुन बेटी बचाव बेटी पढाव बेटी बढाव चे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले त्यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ भेट वस्तु देवुन सत्कार व अभिनंदन घडवुन आणले . तसेच विचखेडे शाळेचे सुनिल बडगुजर यांनी २५ विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्य भेट दिले व केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक व अनेक शिक्षक बंधु बघिनिंनी या गुणवंत विद्यार्थीनींना रोख पारितोषिक दिले . या ठिकाणी विद्यार्थीनींनी " बेटी हु मै , बेटी मै सहारा बनुंगी " हे छान प्रबोधन करणारे कृतीयुक्त गीतही सादर केले . एकंदरीत या शिक्षण परिषदेत बेटी बचाव बेटी पढाव चा जागर करण्यात आला हे बघुन मला विशेष आनंद झाला असे प्रतिपादन विश्वासराव पाटील , गट शिक्षणाधिकारी यांनी केले .
या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत तर निरीक्षक म्हणुन वर्षा पाटील , विशेष शिक्षिका उपस्थित होत्या. अतिशय सुंदर व गुणवत्तेचे प्रदर्शन करणारे उपक्रम विद्यार्थीनींनी सादर केले . तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी आपआपल्या वर्गासाठी राबविलेले उपक्रम यांचे " शिक्षण कार्य प्रदर्शन " आयोजित केले होते . त्याचा लाभ सर्व शिक्षकांनी घेतला .
शाळेचे मुख्याध्यापक आसिफ बेग इब्राहिम बेग यांनी प्रास्तविक तर मोहम्मद रईस मो इब्राहिम यांनी सुंदर असे सुत्रसंचलन केले . शेख नसरीन अ रशिद , मोहम्मद रईस मो . इब्राहिम , मोमिन सलमा बानो मो रज्जब , फिरोजखान रफीक खान पटवे , मोहम्मद फरीद शेख जैनुद्दीन , शेख कलंदर कमरुद्दीन , मोहम्मद कामरान मो लुकमान , रुबीना शाहीन रहीम खान , अन्सारी फरीहा बानो नईम अहमद यांनी शिक्षण परिषदेतील विषयांवर आपले मते मांडली . केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत यांनी शिष्यवृत्ती तयारी , अपार आयडी , शापोआ , बालिका सुरक्षा , तक्रार पेटी , गुणवत्ता वाढ याबाबत सखोल मार्गदर्शन केले . मोहम्मद कामरान मो . लुकमान यांनी आभार प्रदर्शन केले .


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या