Type Here to Get Search Results !

Banner

मारवड कला महाविद्यालयात "वाचन कौशल्य" कार्यशाळा संपन्न


अमळनेर: मारवड ता.अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ  मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" आणि  "वाचन पंधरवाडा" या निमित्त महाविद्यालयात 'वाचन कौशल्य कार्यशाळा'आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. डॉ.सतीश पारधी (राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी) यांनी केले,यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले अध्यक्ष स्थानी होते. अध्यक्ष मनोगतात दि. 1 जानेवारी 2025 ते दि.15 जानेवारी 2025 वाचन पंधरवाडा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे, महाविद्यालयाने या कालावधीत दरम्यान ग्रंथ प्रदर्शन,  सामूहिक वाचन , वाचन कौशल्य  यावर भर देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. वर्तमानपत्रे, मासिके, ग्रंथ वाचण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी अशा पंधरवाडा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याची अध्यक्षीय मनोगतन व्यक्त करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. संजय पाटील (मराठी विभागप्रमुख) होते. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आज देखील वाचन संस्कृती टिकून आहे कथा, कादंबऱ्या, नाटक यांनी अनेकांच्या मनावर ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयात असलेली पुस्तके वाचावीत त्यासाठी त्यांच्या ज्ञानात भर पडेल असा मोलाचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. विजय पाटील ग्रंथपाल यांनी केले. या कार्यशाळेचे आयोजन ग्रंथालय-विभागातर्फे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमास महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक आणि शिक्षककेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या