Type Here to Get Search Results !

Banner

सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत समुपदेशक कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली


जळगाव: सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत विद्यार्थिनींसाठी ताण-तणाव, व्यसनाधीनता, आत्महत्येचे विचार, उदासीनता, नैराश्य, अशा विविध समस्यांमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्महत्यासारखे गंभीर प्रकार झपाट्याने वाढत आहेत.त्यावर प्रतिबंध व्हावा म्हणून आज दिनांक ७ जानेवारी २०१५ रोजी मानसिक आरोग्य पथक जिल्हा रुग्णालय जळगाव, यांच्यातर्फे श्री.दौलत निमसे पाटील यांनी विद्यार्थिनींना समुपदेशन कार्यशाळेतुन मार्गदर्शन केले. 

यामुळे सर्व विद्यार्थीनींमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री शिंदीकर, पर्यवेक्षिका सौ.लीना कुळकर्णी, ज्येष्ठ शिक्षिका सौं.वंदना तायडे, सौ.अंजली कुळकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दिपक रघुनाथ पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या