जि प प्राथ. शाळा जवखेडे ता. अमळनेर जि. जळगाव येथे चिमुकल्यांचा बाल आनंद मेळावा खूप उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ कविता प्रफुल्ल पाटील, बाला उपक्रम समितीचे अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, मा.सरपंच सौ. जयश्री कैलास माळी यांनी फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यात इयत्ता पहिली तर इयत्ता चौथी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी नानाविध प्रकारचे पदार्थ बनवून विक्रीसाठी स्टॉल मांडले होते. त्यामध्ये बटाटा पापड,भेळ, पोहे, खमन, गोड बोर, चॉकलेट, वेफर्स, पॉपकॉर्न, पास्ता ,मॅगी, उसळ, कचोरी समोसा ,आलू वडे , बॉम्बे वडा, पाणीपुरी, तिळीचे लाडू , भुईमुगाच्या शेंगा, हरभऱ्याची उसळ, आप्पे, डोसा, आलू पराठा, पोंगा, पापड, इडली, शेव, शेंगा, चिक्की, गोड भज्या असे नानाविध पदार्थ विक्रीस ठेवले होते. गावातील ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
ग्रामस्थ, पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांच्या आणलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत त्यांना प्रोत्साहन दिले. शाळेचे मुख्याध्यापक श्री छगन पाटील सर यांनी सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मुकेश पाटील सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील उपशिक्षिका श्रीमती रत्नप्रभा साळुंखे मॅडम, श्रीमती रेखा पाटील मॅडम, श्रीमती सुनिता पाटील मॅडम, श्रीमती अर्चना बागुल मॅडम, उपशिक्षक श्री. मुकेश पाटील सर व श्री. माधवराव ठाकरे सर तसेच युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती अनिता पाटील मॅडम या सर्वांनी मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या