Type Here to Get Search Results !

Banner

विद्यार्थ्यांनी सायबर सेक्युरिटीवर लक्ष केंद्रित करावे-एसीपी डॉ.अशोक बागुल यांचे प्रतिपादन


● सायबर लॉ, क्राईम यावर दिले व्याख्यान
● विद्यार्थ्यांना तत्वज्ञान व स्वानुभवातून दोन तास दिली माहिती 
● समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण जैन
● एसीपी डॉ.बागूल यांनी पीपीटी द्वारे केले मार्गदर्शन
● मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ व खानदेश शिक्षण मंडळ यांचा संयुक्त उपक्रम.

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर, मंगळ ग्रह सेवा संस्था,राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान,वाईस ऑफ मीडिया, करिअर कौन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर लॉ व क्राईम या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी नागपूर येथील सायबर ला व क्राईम या विषयावरील तज्ञ एसीपी डॉ.अशोक बागूल यांचे पूज्य साने गुरुजी सभागृहात दिनांक ११ फेब्रुवारी  रोजी  व्याख्यान  झाले. याप्रसंगी व्यासपीठावर खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल,ज्येष्ठ संचालक योगेश मुंदडे,प्रदीप अग्रवाल,चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, पोलीस निरीक्षक विकास देवरे, मंगळ ग्रह सेवा संस्थाचे अध्यक्ष तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.डिगंबर महाले  उपस्थित होते.
प्रारंभी पत्रकार किरण चव्हाण यांनी जय जय महाराष्ट्र माझा...गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत म्हटले.  करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे यांनी प्रास्ताविक केले.
     खा. शि. मंडळाच्या  पदाधिकाऱ्यांनी एसीपी डॉ.अशोक बागुल यांचे एकूणच अष्टपैलू कार्य व पोलीस दलासह समाजा प्रतीचे योगदान या प्रित्यर्थ  गौरव चिन्ह,प्रतापीय चा अंक व शाल देऊन सत्कार केला. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे राबवीत असलेले विविध समाजाभिमुख उपक्रम व श्री मंगळ ग्रह मंदिराची प्रगती या प्रित्यर्थ डॉ.डिगंबर महाले यांचाही विशेष सत्कार करण्यात आला .
        डॉ. बागुल यांचा परिचय डॉ.महाले यांनी करून दिला.  डॉ. बागुल यांनी  जवळपास दोन तास विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनातील फसगतीची अनेक उदाहरणे  व स्वानुभवातून सायबर स्पेस, सायबर क्राईम,सायबर सेक्युरिटी व लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा या बाबत सर्वांना सहज समजेल अशा पद्धतीने व मिश्किल शैलीत माहिती सांगितली. सायबर क्राईमच्या  संदर्भात फसगत झाल्यास काय करावे ? फसगत होऊच नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ?याबाबतही त्यांनी अनेक उदाहरणे  दिली. मोबाईलच्या माध्यमातून फसगतीचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे मोबाईल मधून येणाऱ्या विविध आर्थिक व लैंगिक अमिशांना कसे टाळावे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेतील यश व व्यक्तिमत्त्वाच्या विकासात कशा कशाचा समावेश असणे गरजेचे आहे ? या बाबतही त्यांनी प्रबोधन केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थितांचेही त्यांनी निरसन केले. प्राचार्य डॉ .अरुण जैन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

         यावेळी प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित पाटील, डॉ.कल्पना पाटील,डॉ.व्ही बी मांटेही उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला , आशिष चौधरी, लायन्स क्लबचे अध्यक्ष सीए अजय हिंदुजा, सेक्रेटरी विनोद अग्रवाल,अनिल रायसोनी, रवींद्रसिंग कालरा,  पांडुरंग पाटील, मिलिंद पाटील, जयेश काटे,अजय भामरे , ॲड .के. व्हि.कुलकर्णी, वकील संघाचे अध्यक्ष ॲड . किरण पाटील,माजी अध्यक्ष  ॲड.यज्ञेश पाटील यांच्यासह  महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ.धनंजय चौधरी यांनी केले तर आभार प्रा.विजय साळुंखे यांनी मानले.
 राज्यशास्त्र विभागाचे डॉ.हर्ष नेतकर यांनी व्हायोलिन द्वारे राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रताप महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या