अमळनेर: दरवर्षाप्रमाणे प्रगती कोचिंग क्लासेस इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना स्नेह पूर्वक शुभेच्छा देत असते. याही वर्षी मोठ्या उत्साहात अमळनेर शहरालगत असलेल्या निसर्गरम्य अमरीष ऋषी टेकडी येथे समारंभ आयोजित करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची सुरवात सकाळपासूनच सुरू झाली, त्यात योगा व प्राणायाम विविध खेळ बौद्धिक व्याख्यान यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या शुभ सकाळी योगा व प्राणायाम शिबिरासाठी डॉ. अनिल दुसाने फिजिओथेरपिस्ट यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच प्रथम सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन सुमन क्लासेस चे संचालक नानासो चंद्रकांत बडगुजर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जायन्ट्स ग्रुप चे मार्गदर्शक
पी. आर .भावसार सर, यु जी देशपांडे सर, जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील सर , जायन्ट्स ग्रुप उपाध्यक्ष श्री राजेंद्र भावसार सर , खजिनदार राजेंद्र पाटील सर ,जायन्ट्स ग्रुपचे सदस्य महेश पाटील, रमेश महाजन,डॉ महेश पाटील,चोपडा महाजन इंग्लिश क्लासेस चे संचालक दिपक महाजन सर, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन सर,लोकमान्य विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जे. के. चौधरी सर, सप्तशृंगी इरिगेशनचे युवा उद्योजक बापूराव महाजन, प्राचार्य प्रकाश महाजन सर, मासिक माळी भूषण चे संपादक प्रा. भीमराव महाजन सर,पालक प्रतिनिधी कैलास महाजन, रविंद्र महाजन आदी. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला इ 10 वी च्या विद्यार्थिनी कु गायत्री वानखेडे व कु तन्वी बारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख व्याख्याते पंकज कम्प्युटरचे संचालक तथा जायन्ट्स उपाध्यक्ष राजेंद्र भावसार सर यांनी सायबर सिक्युरिटी व AI तंत्रज्ञान या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच चोपडा महाजन इंग्लिश क्लासेस चे संचालक दिपक महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता जाता.... या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापक मनोहर महाजन सर,जेष्ठ शिक्षक जे. के.चौधरी सर यांनी शुभेच्छा मनोगते व्यक्त केली तसेच शैक्षणिक वर्ष 2023/ 24 मध्ये इ 10 वीत इंग्रजी विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम पारितोषिक वैष्णवी रामकृष्ण शेलकर, द्वितीय पारितोषिक भाविका जगदीश महाजन व खेमराज अरविंद पाटील यांना वितरित करण्यात आले.व अध्यक्षीय भाषणाने प्रथम सत्र संपन्न झाले.
दुपारी सर्व विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या सोबतीने सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, फिशपॉंड, व धमाल नृत्य करून कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच सूत्रसंचालन तन्वी पाटील व प्राची पाटील यांनी केले. स्वागत गीत दिव्या चौधरी, नेहा पाटील, मोना महाजन यांनी सुमधुर स्वरात गायन केले.तसेच या कार्यक्रमाचे छायाचित्रण नासिक येथील वेड फ्लिक्स फोटोग्राफर भूषण महाजन यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप महाजन सर व युक्ता महाजन मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या