धरणगाव प्रतिनिधी: आज उखळवाडी ता.धरणगाव येथे मारोती चौकामध्ये साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे ता. धरणगावच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सवानिमित्त प्रबोधनात्मक पथनाट्य व भाषणाचा कार्यक्रम संपन्न केला.
शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजक सरपंच देविदास पाटील, सुरेश पाटील, योगेश पाटील, प्रेमचंद भालेराव, कृष्णा पाटील, योगेश पाटील, रवींद्र पाटील, निळकंठ पाटील, संदीप पाटील, सतीश पाटील व प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक सुनील शिसोदे गुरुजी हे होते. आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
मुख्याध्यापक एस डी मोरे म्हणाले छत्रपती शिवरायांनी जनतेच्या कल्याणासाठी, अठरापगड जातींचे मावळ्यांचे सैन्य उभारून बलाढ्य मोगल शाहीला नमून स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्यात अष्टप्रधान मंत्रिमंडळ निर्माण करून, प्रजाहित दक्ष राजा म्हणून जग विख्यात कामगिरी आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण केली. असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील सरपंच देविदास भाऊ पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नाट्यछटे मध्ये राजमाता जिजाऊंची भूमिका भाग्यश्री पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मानस बहाळे, व तुषार पाटील, बाल शिवाजी कु ईशान कोल्हे, महाराणी बडी बेगम सहारा पटेल, अफजलखानाची भूमिका गणेश बोरोले प्रस्तावना व शिवगर्जना तेजस्विनी पाटील आणि अफजल खानाचे सैन्य खुशवंत बाविस्कर, ईशांत ढाके, भावेश बाविस्कर व शिवाजी महाराजांचे मावळे राहुल इंगळे, साहिल मोरे, ओम पाटील, भावेश पाटील आदी आणि जिजाबाईंच्या सवंगडी स्वाती पाटील, भाग्यश्री सोनवणे, तोषिका नारखेडे, रुचिता पाटील, मोहिनी पाटील, साहिली बारेला आदी अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे छान अशी भूमिका साकारली. भाषण स्पर्धेमध्ये पूर्वा पाटील, दिशा पाटील, देवश्री बाविस्कर, अरहान पटेल आणि पोवाडा गायनामध्ये तनुजा पाटील या विद्यार्थिनींनी भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आले. व सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद दिले. या कार्यक्रमासाठी सौ नीता पाटील मॅडम, सौ आर पी नेहेते मॅडम, सौ प्रतिभा पाटील मॅडम, आणि ए वाय शिंगणे, एस पी तायडे, व्ही एस कायंदे, बी आर बोरोले, दिगंबर पाटील सर व शिक्षकेतर कर्मचारी गुलाब ठाकरे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साळवे इंग्रजी विद्यालय साळवे यांनी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व्ही के मोरे यांनी केले व सर्व ग्रामस्थांचे सरपंच उपसरपंच व आयोजकांचे आभार मानून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या