अमळनेरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
अमळनेरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
अमळनेर : खान्देशात सुख असो वा दु:ख असो, प्रत्येकवेळी ‘माय’ हा शब्द वापराला जातो, म्हणून अहिराणीला मायबोली म्हणतात. मात्र अहिराणी भाषेबद्दल गैरसमज असल्याकारणाने आम्हाला बोलताना कमीपणा वाटतो, असे न करता काहीही करा मात्र अहिराणी भाषा जिवंत ठेवा, अशी अपेक्षा संमेलनाचे उद्घाटक, ज्येष्ठ पत्रकार तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी अमळनेरात सुरू झालेल्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्धाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अहिराणी भाषा अभ्यासक व सुप्रसिद्ध लेखक डॉ. रमेश सूर्यवंशी, आमदार अनिल पाटील, महाराष्टÑ राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, धनदाई माता एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अहिराणी भाषेचा जागर व्हावा या उद्देशाने आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्धाटन ३० रोजी अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.कानबाईचे पूजनाने उद्घाटन झाले.
डॉ. महाले पुढे म्हणाले की, या कार्यक्रम स्थळाला साथी गुलाबराव पाटील यांचे नाव दिलेले आहे. त्यांनी अहिराणी भाषेचा जागर व्हावा, अहिराणी भाषेला राजपात्रित दर्जा मिळावा म्हणून खूप मोठा लढा दिला होता, मात्र दुर्दैव अजूनही ते होऊ शकले नाही. अहिराणीला राजपत्रित भाषेचा दर्जा मिळावा असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात यावा .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, सभापती अशोक पाटील, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन, लेखक व कवी प्रभाकर शेळके, डी. डी. पाटील, प्रशांत मोरे, प्रा. अशोक पवार, रामेश्वर भदाणे, वाल्मिक मराठे, निलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिराणी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सर्व मिळून प्रयत्न होणे आवश्यक आहे, अशीही अपेक्षा यावेळी अर्चना राजपूत, महाराष्टÑ राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनीही आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
आमदार अनिल पाटील यांनी यावेळी सर्व भाषांची राणी म्हणजे अहिराणी भाषा होय, असे गौरवोद्गार काढले. अहिराणी भाषेला विधिमंडळात अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा या साठी प्रयत्न करेल असे अभिवचन दिले..
अहिराणी भाषेला समर्पित असलेले अहिराणी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील आणि मेळघाटचे लेखक व अभ्यासक संजय ईश्वरदास गायन यांना अहिराणी साहित्य भूषण पुरस्कार तर धुळ्याच्या सुमन देसले यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी लेखक व समीक्षक प्रा. डॉ. फुला बागुल, बोधचिन्हकार किरण बागुल आणि लेखक व कवी प्रभाकर शेळके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
सोशल मीडियासारख्या विविध माध्यमातून अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार करणारे निकिता पाटील, इंदिरा नेतकर, दीपक पवार, दीपक खंडाळे, गोल्डन पाटील, संतोष पाटील, विजय पवार, गरबड अहिरे, विश्राम बिरारी, अशोक पाटील, रवींद्र भोई, विलासकु मार शिरसाठ, कैलास चव्हाण, डॉ. दत्तात्रय ठाकरे, ईश्वर माळी, जयराम मोरे, समाधान बेलदार आणि संदीप भोई यांनाही अहिराणी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रभाकर शेळके लिखित अहिराणी काव्य संग्रह तिन्ही दुनिया, डॉ. वाल्मिक अहिरे लिखित खान्देशातील आह्यना, ज्ञानेश्वर भामरे लिखित वाघडीना शानाभो, भगवान पाटील लिखित नाटक नियोग आणि बापूराव ठाकरे लिखित राजर्षी शाहू महाराज या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
प्रसिद्ध अहिराणी रीलस्टार निकिता पाटील यांनी सादरीकरण करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
प्रास्तविक प्रा. भगवान पाटील यांनी केले.भूमिका प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी मांडली. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे व शरद पाटील यांनी केले .आभार रणजित शिंदे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या