नवजात नवं विश्वासार्ह वचन!
जाधव इंग्लिश क्लासेसचं शैक्षणिक कुटुंब वाढतंय…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आशा, प्रेम, आणि शिक्षणाचं वचन देत, जाधव इंग्लिश क्लासेस मोलाचं कार्य करीत आहे. वडिलांच्या छत्राखाली तर नाहीच, पण परिस्थितीच्या आव्हानांवर मात करीत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रकाशात आणण्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश देत आहेत. गेल्या 24 वर्षांपासून चालणाऱ्या या उपक्रमामुळे, अनेक अनाथ आणि उपेक्षित मुलांचे जीवन उजळले आहे.
संचालक विनोद जाधव सर यांच्या नेतृत्त्वाखाली, दरवर्षी 90 ते 100 विद्यार्थ्यांना (आणि सध्या या संख्येत वाढ होत आहे) मोफत शिक्षण देणारे हे केंद्र, समाजात प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे.
आज, 1 मार्च 2025, इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी प्रशांत एकनाथ चौधरी, यांच्यासोबत पुन्हा भेट झाली. जळोदच्या या विद्यार्थ्याने जाधव क्लासेसची साथ इ. 8वीपासून घेतली आहे. वडिलांच्या निधनानंतर, प्रशांतने शिकण्याची जेवढी आशा ठेवली, तितकीच त्याच्यासोबत त्याची बहीण नेहा देखील मोठ्या मनाने शिकत आहे. जाधव क्लासेस चा उद्देश या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवणे हा आहे. विनोद जाधव सरांचा हा मनोबल आपल्याला शिकवतो की, शिक्षण फक्त ज्ञान नाही, तर एक अशी शक्ती आहे जी समाजात बदल घडवू शकते.
“आजवर असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं, आणि अनेक विधवा माऊलींच्या डोळ्यातील आनंदाश्रू हाच माझा खरा पुरस्कार आहे. हेच माझं सार्थक आहे,” असं सरांचं म्हणणं आहे. आपल्याला ह्या कार्यात मदतीची आवश्यकता असते, आणि विनोद जाधव सरांच्या प्रयत्नांची गूढता शिकवते की दयाळूपणं कधीही कमी होत नाही. जाधव इंग्लिश क्लासेस ही फक्त एक शाळा नाही, ती एक आशेचा किरण आहे जो समाजात शिक्षणाचं महत्व समजावून सांगतो!
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या