Type Here to Get Search Results !

Banner

राज्यात पुढील चार-पाच दिवस मुसळधार!

राज्यात पुढील चार-पाच दिवस मुसळधार!

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची शक्यता (India Meteorological Department) IMD ने वर्तवली आहे. स्मॉल ऑरेंज डायमंड, उत्तर-पश्चिम मध्यप्रदेश, पुर्व राजस्थान स्थित कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात क्षीण होतं आहे. स्मॉल ऑरेंज डायमंड बंगालच्या उपसागरावरची सिस्टिम पुढच्या 12 तासात ओरिसाकडे सरकेल व पुढच्या 2,3 दिवसात पश्चिम- उत्तर पश्मिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिलीय.

याठिकाणी पडणार पाऊस !

कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

19 सप्टेंबर- राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)

21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)

22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)


याठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभाग मुंबई यांनी वर्तविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या