Type Here to Get Search Results !

Banner

मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न

मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी नियोजन करावे -मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांचे आवाहन 

मुक्ताईनगर- शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची आढावा सभा नुकतीच घेण्यात आली. मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष श्री आर पी पाटील सर यांनी गटशिक्षणाधिकारी श्री विजय पवार यांचे स्वागत केले. सभेचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख राजू तडवी यांनी केले. 

गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी मार्गदर्शन करतांना माध्यमिक शाळा शिक्षक उपस्थिती, लसीकरण, सरल प्रणाली, शालेय पोषण आहार वाटप, आधार नोंदणी इत्यादी विषयांचा आढावा घेतला. कोरोना काळात शाळा व मुख्याध्यापक यांची भूमिका महत्वाची असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्री विजय पवार यांनी केले. रोखपाल श्री सैतवाल यांनी समग्र शिक्षा योजनेची माहिती दिली.विषयतज्ञ रवींद्र बावनकुळे यांनी एम डी एम पोर्टलबाबत मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख अनिल कुमार पाठक यांनी केले. सभा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर पी पाटील सर, केंद्र प्रमुख संजय ठोसर, प्रदीप कोसोदे, सर्व विषय तज्ञ आणि विशेष शिक्षक, बी आर सी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या