Type Here to Get Search Results !

Banner

चाळीसगाव तालुक्यात मुसळधार ! नद्यांना पाचव्यांदा पूर, गावचा संपर्क तुटला !

चाळीसगाव तालुक्यात मुसळधार ! नद्यांना पाचव्यांदा पूर, गावचा संपर्क तुटला !

शहरासह तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. शहरातून वाहणाऱ्या डोंगरी व तितुर नदीला पूर आला असून पुराचे पाणी शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या पुलांवरून असल्याने दोन्ही बाजूचा संपर्क तुटला आहे. शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. तालुक्यातील शिवापुर, पाटणादेवी, मोठा महादेव, कन्हेरगड, परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पाटणा गाव आणि परिसरात पाऊस सुरुच असल्याने नदीपात्रात अजून पाणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नदीलगतच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या