Type Here to Get Search Results !

Banner

वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना अभ्यास संच वाटप

वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना अभ्यास संच वाटप

जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वडाळी दिगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरपोच सरावासाठी अभ्यास संच वाटप करण्यात आला. कोरोना महामारीमूळे शाळा विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष सुरु झालेल्या नाहीत. ऑनलाईन,ऑफलाईन प्रत्यक्ष गृहभेटीतून,समूह,गटपद्धतीने तसेच शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे घरपोच भेटी घेत अभ्यास संच भेट देण्यात आला. गणित विषयाच्या सरावासाठी याचा उपयोग होणार आहे तसेच यावेळी पालकांच्या भेटी घेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. 

मुख्याध्यापक योगेश काळे,उपशिक्षक निलेश भामरे व संदिप पाटील यांनी सदर उपक्रम राबविला. केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश शिनगारे,उपाध्यक्ष भागवत घोरपडे,शाळा व्यवस्थापन समिती माजी सदस्य राहुल शिनगारे व इतर पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या