Type Here to Get Search Results !

Banner

विजय मोरे, कमलेश मोरे व दिनेश मोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

विजय मोरे, कमलेश मोरे व दिनेश मोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर 

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ कार्यालय गुरुकुंज आश्रम मोझरी महाराष्ट्र संचलित श्रीगुरुदेव सेवामंडळ यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार विजय काशिनाथ मोरे माध्यमिक शिक्षक साळवा ता.धरणगाव, कमलेश भगवान मोरे जि.प प्राथमिक शाळा पातोंडा ता.अमळनेर आणि दिनेश रमेश मोरे जि.प शाळा मारवड या शिक्षकांना जाहिर करण्यात आला आहे. विजय मोरे यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून गणित व विज्ञान विषयाचे जवळ-जवळ 70 पेक्षा जास्त युट्युब व्हिडिओ तयार करुन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. यासह विजय मोरे यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. कमलेश मोरे यांनीसुद्धा कोरोना काळात नियमांचे पालन करुन शिक्षक आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविला. दिनेश मोरे यांनी शाळा व समाज यांची सांगड घालून मठगव्हाण व मारवड येथील ग्रामीण भागातील शाळा ह्या डिजीटल बनवल्या. त्यांना या वर्षाच्या जिल्हा परिषद जळगावचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल अधिकारी वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी आणि संत रोहिदास महाराज परिवाराने त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या