Type Here to Get Search Results !

Banner

लोकमान्य विद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरा

लोकमान्य विद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरा

लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री यांची जयंती निमित्ताने प्रतिमा पुजन संपन्न झाले. आज दि.०२ आक्टोंबर २०२१ शनिवार रोजी लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संचलित लोकमान्य विद्यालय ता.अमळनेर या ठिकाणी भारतरत्न 'लाल बहादूरशास्त्री' आणि राष्ट्रपिता 'महात्मा गांधी' यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विद्यालयातील मुख्याध्यापक रविंद्र लष्करे सर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोहर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र लष्करे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. यावेळी जे.के.चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मधुकर सोनार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक बंधु-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या