Type Here to Get Search Results !

Banner

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार

 

जळगाव-सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे महाडीबीटी प्रणालीवर राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शैक्षणिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्ती जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी सन २०२१ २२ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नूतनीकरणाचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे.

सन २०२०- २०२१ या शैक्षणिक वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज भरलेले आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे लागॅइन प्रलंबित आहे, अशा विद्यार्थ्यासाठी सुध्दा महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याची अंतिम सुविधा ३१ जानेवारी २०२२ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज संकेतस्थळावर ऑनलाइन भरावेत. सर्व महाविद्यालयांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या