अमळनेर प्रतिनिधी: १ मे रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा तर्फे उत्तर महाराष्ट्र स्तरिय अधिवेशन २०२२ नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पार पडले. याप्रसंगी नामदार गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या हस्ते लोकमतचे पत्रकार तथा मंगळ ग्रह संस्थान चे अध्यक्ष श्री डिंगबर महाले सर यांचे पत्रकार क्षेत्रातील योगदान व धार्मिक कार्याची दखल घेत जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या