Type Here to Get Search Results !

Banner

लोकमान्य विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा ! (lokmanya Vidyalaya hindi divas)


अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर या ठिकाणी आज दिनांक 14/09/2022 हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लोकमान्य विद्यालयात सर्व मा.तहसील कार्यालय अमळनेर आयोजित विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी इयत्ता 5 वी ते 7 वी हा लहान गट तर इयत्ता 8 वी ते 10 वी हा मोठा गट करण्यात आला होता. या निबंध स्पर्धेसाठी लहान गटासाठी "सबसे प्यारा देश हमारा" तर मोठ्या गटासाठी "अमृत महोत्सवी भारत", "विविधता मे एकता" असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी लोकमान्य विद्यालयाचे हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ. मृदुला झारे आणि श्री.मधुकर सोनार यांनी काम पाहिले. त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रविंद्र मोतीलाल लष्करे यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या