Type Here to Get Search Results !

Banner

रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ तर्फे मनपा सेमी इंग्लिश स्कुल शाळेस स्मार्ट T.V. भेट

 

सोलापूर: रो.पुनम देवदास आणि रो.सुरज देवदास यांचेकडून रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ यांचे मार्फत मनपा सेमी इंग्लिश स्कूल विडी घरकुल शाळेत स्मार्ट टीव्ही संच विद्यार्थांची गुणवत्ता वाढीसाठी उपलब्ध करून दिला. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष रो.निहार बुरटे यांनी शाळेच्या गुणवत्ते बाबत आनंद व्यक्त केला. 

तसेच यापढेही शाळेस भरीव मदत देण्याचे सर्वानुमते आश्वासन दिले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर रो.निहार बुरटे, सचिव रो.धनश्री केळकर, भावी अध्यक्ष रो.अर्जुन आष्टगी, मा.अध्यक्ष रो.गुरु सद्द्लगी, रो.सूरज देवदास, आदीसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री व्यंकटेश बेत, शिक्षणप्रेमी नागरिक श्री रामू करली, व्यंकटेश सादुल, ज्येष्ठ शिक्षक श्री अरुण डोके सह उपस्थित पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन अरुण डोके यांनी तर प्रास्ताविक व आभार दत्तात्रय चौगुले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या