Type Here to Get Search Results !

Banner

विद्यार्थींनीनी बनविल्या जवानांसाठी राख्या मुंदडा विद्यालय अमळनेर :एक राखी सैनिकांच्या सन्मानासाठी


अमळनेर: स्व.श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या व स्व. निर्मितीचा आनंद घेतला. स्वतः तयार केलेल्या राख्या रक्षाबंधनानिमित्त आपल्या देशसेवा करणाऱ्या भावांना पाठविल्या .शाळेचे या उपक्रमाचे 9 वे वर्ष आहे .नऊ वर्षापासून सतत प्रत्येक वर्षी जवानांसाठी शाळेतून राख्या पाठवल्या जातात .राख्या बनवितांना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता .यात तिरंगा राख्याचे प्रमाण जास्त होते .जवान जीवाची पर्वा न करता परिवाराला सोडून ऊन, वारा ,पाऊस, डोंगर-दऱ्या ,पहाड या ठिकाणी सेवा देत आहेत. अनेक सण उत्सव परिवारात असतात .पण माझा जवान भाऊ त्यावेळेला नसतो .आणि म्हणून एक रेशमचा धागा भावाला बांधून दीर्घायुष्य परमेश्वराकडे मागत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या .ही संकल्पना शाळेच्या उपशिक्षिका सौ.नेहा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यां समोर मांडली असता विद्यार्थ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक विद्यार्थ्यांचे वडील, भाऊ ,काका ,दादा सैन्यात आहेत. त्यांना राख्या पाठवतांना एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंद दिसत होता . मुख्याध्यापक श्री .धनराज महाजन सर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बहीण भावाच्या नात्याविषयी माहिती दिली.

या विद्यार्थ्यानी बनाविलेल्या राख्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले.
1️⃣जयेश भानुदास भोई इयत्ता- 10वी - प्रथम
2️⃣प्राची मधुकर महाजन इयत्ता -9 वी-द्वितीय
3️⃣ वैष्णवी प्रशांत भोई -इ .9 वी -तृतीय

उत्तेजनार्थ -सोनाली राजेंद्र भोई -8 वी
या विद्यार्थ्याचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला .
परीक्षक म्हणून सर्वच शिक्षकांनी कामकाज सांभाळले. सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या